आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिक्षकांना ‘अच्छे दिन’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पगार कमी आणि काम जास्त अशी ओरड देशातील शिक्षक करताना दिसून येतात. तुटपुंज्या मानधनावर विद्यादानाबरोबरच निवडणुकीचंही काम शिक्षकांना करावं लागतं; परंतु आता शिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

बंगळुरूमधील काही खासगी शाळांतील शिक्षकांना ७.५ ते १८ लाख वार्षिक पॅकेज दिलं जात आहे, तर इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्याध्यापकांना १.५ कोटी रुपयांचे घसघशीत वार्षिक पॅकेज मिळत आहेत. समाजात शिक्षकांकडे मोठ्या आदरानं पाहिलं जातं; परंतु आता शिक्षकांना सन्मानासोबत आकर्षक पगार मिळत आहे.

बंगळुरूमधील शिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. येथील शिक्षकांना भरमसाट पगार दिला जात आहे. वाइटफिल्ड सरजपूर रोडवरील एका आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिक्षकांना ७.५ लाख ते १८ लाख रुपये वार्षिक पॅकेज दिलं जात आहे. म्हणजेच १० हजार ते दीड लाख रुपये प्रतिमहिना पगार दिला जात आहे.

या शाळेतील मुख्याध्यापकांना २.२ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच दीड कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिलं जात आहे. स्कूलमधील परदेशी शिक्षकांना ६० हजार ते ९० हजार अमेरिकी डॉलर वार्षिक पॅकेज दिलं जात आहे.

तसंच मोफत राहण्याची सुविधा, कुटुंबांना भेटायला जाण्यासाठी मोफत हवाई प्रवास यांसारखी सुविधा शाळेकडून पुरविली जात आहे. प्राथमिक शाळांतील शिक्षकांना ६२ हजार ते १.७५ लाख रुपये प्रतिमहिना, तर मुख्याध्यापकांना १.२५ लाख ते २.५ लाख रुपये प्रतिमहिना दिला जात आहे. भारतात शिक्षकांना फारसा पगार दिला जात नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24