अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील लक्ष्मण वामन सांगळे (वय ३५वर्षे), रा. गरडवाडी या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी दुपारी शेवगाव -ढोरजळगाव महामार्गावरील सांगळेवस्तीनजीक घडली.

लक्ष्मण सांगळे व त्यांचे सहकारी पाटेकर वस्ती याठिकाणी अक्षयप्रकाश योजनेच्या कामाचे विजेचे खांब उभे करत होते. या वेळी मुख्य विद्युत लाईनमधून खांबात वीज़प्रवाह उतरल्याल्यामुळे सांगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी व आई-वडील, असा परिवार आहे.

लक्ष्मण सांगळे यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल नव्हता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24