मुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :’तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी बघितले आहे’, अशी बतावणी करून दोघांनी यश पॅलेस चौकात चल, असे म्हणून एकाला फसवून मोबाईल चोरून नेला. कायनेटीक चौकाजवळील इलाक्षी शोरूम समोर ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरख दत्तात्रय चव्हाण (रा.राणी लक्ष्मीबाई चौक, केडगाव) हे दुचाकीवरून केडगाववरून शहराच्या दिशेने येत होते.

त्यावेळी इलाक्षी शोरूमजवळ विना नंबरच्या दुचाकीवरील दोघांनी त्यांना अडविले. ‘तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी पाहिले आहे’, अशी बतावणी करून त्यांनी मोबाईल हँडसेट काढून घेतला. यश पॅलेस चौकात चल, असे सांगितले.

चव्हाण हे यश पॅलेस चौकात आले. परंतु त्यांना मोबाईल घेतलेले दोघेही व्यक्ती आढळून आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गोरख चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24