नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर अंकूश लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.