तक्रारींसाठी स्वच्छता ॲप डाउनलोड करा; नगरसेविका दिपाली बारस्कर यांचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – केंद्र सरकारच्या पथकामार्फत शहरात होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी व नागरिकांनी स्वच्छतेचे मोबाईल ॲप डाउनलोडिंग करण्यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी दक्ष रहावे. स्वच्छता ॲप डाउनलोड करून कचऱ्याबाबत, स्वच्छता गृहांबाबत आपल्या परिसरातील समस्या, तक्रारीची माहिती ॲपवर टाकावी.

स्वच्छता ॲपच्या वापरासाठीही महापालिकेला गुण दिले जाणार आहेत. ॲपवरील तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातील.

त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करावे असे आवाहन नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.

या लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकता 🏻
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24