मनापा कर्मचार्‍यांना अखेर कामवाटप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : नगररचना विभागात महापालिकेने महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना अखेर कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. महिनाभर हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केवळ बसून होते. आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यानंतर कामकाज वाटपास वेग आला. यामुळे येथील कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून बसले होते. काही कर्मचारी तीस तर काही वीस वर्षांपासून एकाच विभागात एकाच टेबलवर काम पाहत होते. त्यातील काहींच्या बदल्या करण्याचा प्रयत्न मध्यंतरी करण्यात आला. 

मात्र त्यांनी बदलीनंतर रजा टाकून प्रशासनावर दबाव आणत पुन्हा नगररचना विभागात तोच टेबल मिळविला. पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांच्या हातमिळवणीने नगररचनातील मक्तेदारी संपुष्टात आणणे कठीण झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24