वृद्धाला बेदम मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर: तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (जेऊर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बाबासाहेब मगर शेतात गेले होतेे. पाण्याचे पाइप काढल्याचे त्यांना दिसले. पाइप का काढले, याची विचारणा केली असता मगर यांना मारहाण केली. याआधी तवले कुटुंबाला मारहाणप्रकरणी मगर कुटुंबातील ५ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आता मगर कुटुबांतील एकास मारहाणप्रकरणी तवले कुटुंबातील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24