दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : भिंगारहून नगरकडे येत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छगन झुंगाजी काळे (वय ७५, रा. लकारे गल्ली, भिंगार) हे सेवानिवृत्त कर्मचारी भिंगारकडून नगरकडे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना एका लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने (एम. एच. २० सी.एच. २२७६) काळे यांच्या दुचाकीस धडक देवून त्यांच्या दु:खापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे.

ही घटना घडताच सदर चारचाकी चालक घटनास्थळावरून निघून गेला. या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24