नगर –
कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भाविकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील, तसेच या ठिकाणाच्या कामासाठी भविष्यात भरीव मदत उभी करून देऊन सदरच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकणासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आमदार जगताप हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी येथील कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भेट दिली. या वेळी मंदिर समितीच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते जगताप यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी कुंदनलाल गुरुद्वारा लाडा सेठ भाटिया, ठाकूर नवलानी, जनक अहुजा, प्रदीप पंजाबी, अनिश अहुजा, संजय अहुजा, करण अहुजा, मिथुन दुपार, चिंटू गंभीर, आकाश मनोचा, मनीष पुराना, दीपक कीर्तने, भाऊसाहेब तांदळे, अमोल गाडे, बबलू खोसला आदींसह सिंधी, पंजाबी समाजबांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
समाज बांधवांच्या विकासाच्या अपेक्षा संग्राम जगताप हे पूर्ण करतील असा विश्वास या वेळी अनेक मान्यवरांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांना पाठबळ राहील, असेही समाज बांधवांनी या वेळी आश्वासन दिले. कुंदनलाल गुरुद्वारा मंदिर समितीतर्फे आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला.