अहमदनगर : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे.
हाॅटेल सन राइज वाकोडी फाटा अहमदनगर येथे हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर धाड टाकून 2 आरोपिंना अटक करण्यात आली 2 पिडीत तरुणींची सुटका केली.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगरमधील वाकोडी फाटा येथील सन राईस लाॅजीग येथे आज संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री,सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके नगर शहर विभाग
तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ ,सहायक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील , पोलीस हवालदार निपसे ,पोलीस नाईक काळे, पोलीस नाईक तागड, फसले ,पोलीस कॉन्स्टेबल गागडे, जाधव , महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, भगत , यांचे टीमने सन राईस लाॅजीग येथे छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 02 मुलीची सुटका केली.
कुंटणखाना चालवणारे १) प्रकाश धनाजी सपकाळ वय २७ रा, सारसनगर
अहमदनगर २) रामेश्वर आप्पासाहेब पाटील वय २७ रा गंगापुर औरंगाबाद याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे भिगार कॅम्प पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करणेचे काम चालू आहे.
(बातमी अपडेट होत आहे)