अहमदनगर : केडगाव येथील हॉटेल रंगोली जवळ चारचाकीच्या कॅबिनमध्ये ठेवलेली पैशाची पिशवी चोरून पळून घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याप्रकरणी पंडीत केरू राऊत (वय ५५ रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राऊत हे शनिवारी (दि.९) सायंकाळी त्यांच्या चारचाकीचा टायर पंचर झाला म्हणून केडगाव येथील हॉटेल रंगोलीजवळ पंचर काढत होते.
यावेळी येथे एक अल्पवयीन मुलगा आला. त्याने चारचाकीच्या कॅबिनमध्ये असलेली बॅग चोरून नेण्याचा प्रयत्न केला. या बॅगेत ५ हजाराच्या रोख रक्कमेसह, आधार कार्ड व चारचाकीचे कागदपत्रे होती. परंतू राऊत यांच्या सावधगिरीमुळे तो प्रयत्न फसला.
राऊत यांनी या मुलाला पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.