ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
संगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग याच्याविरुद्ध भादवि कलम ४०९ प्रमाणे गुरनं. २०२ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आंबेवंगण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करताना त्याच्या ताब्यातीला ग्रामनिधी १४ व वित्त आयोग पेस ग्रामसभा कोष निधी, पाणीपुरवठा निधी खात्यावरील रक्कम रुपये १८ लाख ४८ हजार १८८ इतक्या रकमेचा प्रमाणक शिवाय अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतान घेता नियमबाह्य खर्च करुन सदरचे दप्तर गहाळ करुन कायमस्वरुपी अपहार केला.
तर दुसरी फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे यांनीच दिल्यावरुन आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग या ग्रामसेवकाविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेणीत ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामसेवक रणशिंग याने त्याच्या ताब्यातील ग्रामनिधी १४ वा वित्त आयोग पेसा ग्रामसभा कोषनिधी, पाणीपुरवठा निधी खात्यावरील रक्कम ७५ लाख ६९ हजार ५०४ रुपये इतक्या रकमेचा प्रमाणकाशिवाय व अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून सदरचे दप्तर गहाळ करून कायमस्वरूपी अपहार केला आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24