अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी यांचे सिनेस्टाईल अपहरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज सकाळी राहत्या घराच्या जवळून अपहरण झाले. 

चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज पहाटे करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घातले.

हुंडेकरी यांनी सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले होते, असे  प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे.

दरम्यान अपहरणाच्या ह्या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली.

 

पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

Follow Ahmednagarlive24 to get today’s Ahmednagar Latest News and current news, Live updates,Headlines from Ahmednagar. Find all breaking news & events from Ahmednagar by just 1 click on Ahmednagarlive24.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24