मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का देत नाहीत? असा थेट प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना तूर्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण असं आहे.