एसटी वाहकाला मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली.

वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके हे घाटपिंप्री ते पाथर्डी ही एसटीबस घेऊन येत होते.

आल्हणवाडी येथे दोघे पवार एसटीत आले व तिकिटासाठी पाचशे रुपयांची नोट दिली. वाहकाने पैसे सुटे नसल्याचे सांगून त्यास गाडीतून खाली उतरवून दिले.

याचा राग धरून राहुल, सुरेश व आणखी एक अनोळखी इसम यांनी मोटारसायकल वरून एसटीचा पाठलाग करून पटेलवाडा फाटा येथे एसटीला मोटारसायकल आडवी घालून एसटीत चढले व वाहक संजय सुडके यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी वाहक सुडके यांनी तक्रार नोंदविली आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Pathardi