संगमनेर: मागील वादाचा राग मनात धरुन आदिवासी तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत त्याच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आंबीखालसा येथील शेतकरी सर्जेराव गुलाबराव ढमढेरे याच्यावर घारगाव पोलिसांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.
ही घटना मंगळवारी आंबी खालसा येथे घडली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीलगत विकास गोरक्ष बर्डे हे पत्नी व मुलांसमवेत राहतात.
मंगळवारी सकाळी बर्डे स्मशानभूमीलगतच्या रस्त्याने मुळानदीकडे आंघोळीसाठी चालला होता. सर्जेराव त्याच्या शेतातील घराजवळ उभा होता.
त्याने कुरापत काढत जातीवाचक शिवीगाळ करत तू गावात कसा राहतो, माझ्यावर केस करतो का? असे सुनावले.