फतेहाबाद – सोमवारी रात्री उशिरा खुनान गावाजवळ झालेल्या अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. या मृत भावांमध्ये काला सिंह वय 32,दीपक वय 21,आणि जिंदा सिंग वय 23 यांचा समावेश आहे हे तीनही भाऊ हासपूर गाव येथील रहिवासी आहेत. ते रात्री उशिरा बरवाला गावाजवळून वीट भट्टी पासून माघारी येत होते.
घरापासून केवळ नऊ किलोमीटरच्या अंतरावर खुनान गावाजवळ एका ट्रॅक्टर ट्रॉली ने दुचाकीला टक्कर दिली. या घटनेमध्ये एका तरुणाने जागेवरच आपला जीव सोडला तर अन्य दोघं गंभीररित्या जखमी झाले.
या दुर्घटनेनंतर जवळपासच्या लोकांनी जखमी असलेल्या तरुणांना फतेहाबाद येथील हॉस्पिटलमध्ये नेले, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना अग्रोहा मेडिकल येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी उर्वरित दोन भावांचा ही मृत्यू झाला.
फतेहाबाद येथील सार्वजनिक हॉस्पिटल मध्ये तीनही तरुणांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी तरुणांचे वडील बलबीर सिंह यांची साक्ष घेतली आहे. त्या आधारावर त्यांनी आरोपी ट्रॅक्टर चालक चन्द्रपाल निवासी याच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. या घटनेवर डीएसपी धर्मबीर दुनिया यांनी सांगितले की काला सिंह, दीपक, अग्रोहा बरवाला रोड वर असणाऱ्या एका भट्टीवर काम करत होते.
आणि तेथे जवळच राहत होते. सोमवारी रात्री उशीरा आपल्या कामावरून हे तिघेही ट्रॅक्टर वर आपल्या नातेवाईकाच्या घरी आले आणि तिथून त्यांची दुचाकी घेऊन हासपुर येथील आपल्या घरी निघाले.
त्याच वेळी हासपुर पासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर त्यांच्या दुचाकीला एका ट्रॅक्टर ट्रॉलीने धडक दिली यामध्ये काला सिंह याचा जागेवरच मृत्यू झाला.
तर दीपक सिंह आणि चिंदा यांचा अग्रोहा मेडिकल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रॅक्टर ट्रॉली सोडून फरार झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा तपास सुरू आहे.