नगर – भिंगार, धनगरवाडी (ता. नगर), खातगाव टाकळी (ता. पारनेर) व आंबड (ता. अकोले) येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये नगर जिल्ह्यासाठी ब्लॅक फ्राय-डे ठरला आहे.
भिंगार येथे पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. आसमा वाल्मिक ऊर्फ बबली (वय १९) व शुभम हरिश वाल्मिक ऊर्फ बादल (वय २६) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नींचे नावे आहेत. कँटोन्मेंट बोर्डा कार्यालयातून लकडी पुलाकडे येणार्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत त्यांचे मृतदेह आढळले. हे दोघे दोन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. आज त्यांचे मृतदेह आढळून आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे मायलेकींचे मृतदेह विहिरीत आढळले. कविता सचिन कापडे ऊर्फ नीता (वय २७) व मुलगी प्रणाली (वय ४) असे त्यांची नावे आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण उलगडलेले नाही. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
अकोले तालुक्यातील आंबडे येथील शेतकरी शिवराम जाधव (वय ६५) यांचा ऊस वाहतूक करणार्या बैलगाडी सापडून मृत्यू झाला.
पारनेर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे दोन मोटरगाडींच्या अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले. या अपघात सकाळी झाला. या दोघांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
Entertainment News Updates