सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास होणार १० हजारांचा दंड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : आधार कार्डच्या वापराबाबतची आपल्याला माहिती असायलाच हवी. अनेक सरकारी कामात आधार कार्डच्या नंबरची आवश्यकता असते. काही महिन्यांपूर्वी करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आयकर विभागाने दिलेल्या परमनंट अकाऊंट नंबरच्या ऐवजी आधार नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे.

परंतु जर या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास किंवा आपल्याकडून चुकीचा आधार नंबर दिला गेलाच तर आपल्याला १० हजारांचा दंड आकारला जाऊ शकतो.

वास्तविक पाहता प्राप्तिकर (इन्कम टॅक्स-१९६१) मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार पॅनच्या जागेवर आधार नंबरचा वापर केला जाऊ शकतो. नवीन दुरुस्तीनुसार, चुकीचा आधार नंबर दिल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये प्राप्तीकर भरणे, बँक अकाऊंट उघडणे किंवा ५० हजारांपेक्षा अधिक किमतीचे बॉण्ड किंवा म्युच्युअल फंड, बॉण्ड आदींची खरेदी करताना चुकीचा आधार नंबर दिल्यास १० हजारांपर्यंत दंड होणार आहे.

पॅनच्या जागी चुकीचा आधार नंबर दिल्यास दंड होऊ शकतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या ट्रान्झेक्शनवर पॅन किंवा आधार दोन्हीही न दिल्यास दंड होऊ शकतो.

तसेच आधार नंबरसोबत बायोमेट्रिक ओळख न दिल्यास किंवा आपली ओळख अपयशी ठरल्यास आपल्याला दंड द्यावा लागणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24