Seventh Finance Commission : पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, या कर्मचाऱ्यांना बढती बरोबरच मिळणार 21 हजार रुपयांचे इन्क्रीमेंट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दिल्ली –  सातव्या वेतन आयोगानुसार पगार वाढीची वाट बघणार्‍या 5000000 केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देणार आहे. ऐकण्यात येत आहे की याच आठवड्यात ही भेट कर्मचाऱ्यांना मिळू शकते.

पगारात होणार वाढ

सूत्रांच्या माहितीनूसार नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबाबत मोदी सरकार घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पगारवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. याआधी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चर्चा झाली होती. मात्र टेलिकॉम सेक्टर मध्ये झालेल्या उलथापालथी मुळे या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. यामुळे सगळ्यांचे डोळे मोदी सरकारच्या पुढील कॅबिनेट बैठकीवर लागले होते.

या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन सोबत 21 हजार रुपयांचे इन्क्रिमेंट

भारतीय रेल्वेने आपल्या नॉन गॅझेटेड मेडिकल कर्मचाऱ्यांसाठी प्रमोशन सोबतच सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेल्वेच्या या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजारांपासून 21 हजारांपर्यंत वाढ होणार आहे या कर्मचाऱ्यांमध्ये लैब स्टाफ हेल्थ अँड मेडिकल इंस्पेक्टर स्टाफ नर्स, रेडिओ ग्राफर, फार्मासिस्ट, डायटीशियन, फॅमिली वेल्फेअर ऑफिसर यांचा समावेश आहे

किती वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार

मानले जात आहे की कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करू शकते. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर देण्यात आले आहे. परंतु केंद्र कर्मचाऱ्यांची मागणी आहे यात वाढ केली जावी. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की,

कमीत कमी 18 हजार रुपयांपासून 26 हजार रुपयांपर्यंत वेतन वाढ केली जावी. सूत्रांच्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होऊन ते 3.68 टक्क्या पर्यंत जाऊ शकते. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कमीत कमी आठ हजार रुपयांपासून भर पडू शकते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24