नवी दिल्ली : भाजपाला २०१८ -१९ सालादरम्यान धनादेश व ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटींचा निधी मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३५० कोटीची देणगी टाटा ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या दस्तावेजामध्ये ही माहिती दिलेली आहे.
भाजपाकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाला मिळालेल्या देणगीची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार आर्थिक वर्ष २०१८-१९ दरम्यान धनादेश व ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून भाजपाला एकूण ७०० कोटींहून अधिक निधी मिळाला.
यामध्ये सर्वात मोठा देणगीदार टाटा ट्रस्ट ठरला आहे. टाटा समूहाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या ‘प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’ने भाजपाला ३५६ कोटींची देणगी दिली आहे. या ट्रस्टला भारती ग्रुप, हिरो मोटोकोर्प, जुबिलँट फूडवर्क्स, ओरियंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स सारख्या कॉरपोरेट घराण्यांचे समर्थन आहे.