दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने ट्रकला लागली आग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करत होता. ट्रक आणि दुचाकीस्वाराचा वेग बरोबरच. यातच ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी सापडली. या अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून लांब फेकला गेला. त्यामुळे सुदैवाने वाचला.

परंतु दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्या घर्षणाने ट्रकला आग लागली. क्षणात ट्रक आणि त्याखाली सापडलेली दुचाकी जळून खाक झाला. या प्रकाराने नगर-पुणे रोडवरील वाहतूक दोन तास खोळंबळी होती.

नगर तालुक्याच्या कामरगावात हा आज दुपारी प्रकार झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जळगावहून पुण्याकडे हा ट्रक चालला होता. त्यात छपाईचे कागदाचे गठ्ठ हेाते. त्यामुळे वाहनाने तत्काळ पेट घेतला.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला बोलविण्यात आले होते. अग्निशमन दलाचे अशोक काळे, शिवाजी कदम, संतोष कोतकर यांनी आगीवर पाणी शिंपटून ती आटोक्यात आणली.

स्थानिक ग्रामस्थ तुकाराम कातोरे, संदीप ढवळे, प्रवीण सोनवणे, चैतन्य महापुरे, प्रताप खाडे, ज्ञानेश्वर सोनवणे, मच्छिंद्र जाधव, रोहन भुजबळ, सोहन भुजबळ यांनी मोठी मदत केली.

दुचाकीवरील स्वार या अपघातात फेकला गेल्याने वाचला आहे. परंतु त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Entertainment News Updates

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24