महसूल पथकाच्या ताब्यात असलेला जेसीबी व ट्रॅक्टर पळवला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : महसूलच्या पथकाने ताब्यात घेतलेली अवैध वाळू उपसा करणारी वाहने कारवाईसाठी घेवून येत असताना अमोल काळे, राहूल काळे, स्वप्नील भगत व इतर अनोळखी इसमांनी या पथकास दमदाटी करून सदरची वाहने पळवून नेले.

ही घटना दि.२५रोजी कर्जत तालुक्यातील नागलवाडी गावातील सीना नदीपात्रात घडली. याबाबत कर्जतचे निवासी तहसीलदार सुरेश प्रभाकर वाघचौरे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील नागलवाडी गावातील सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करत असल्याच्या माहितीवरून कर्जत महसूलचे पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी गेले.

या पथकाने एक जेसीबी,एक ट्रॅक्टर व १ ब्रास वाळू असा २० लाख ६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरची वाहने ताब्यात घेवून कारवाईसाठी घेवून जात असताना वरील तिघेजण व इतरर इसमांनी त्या ठिकाणी येवून पथकास मोटारसायकल आडव्या लावून या पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या ताब्यातील वाहने पळवून नेत सरकारी कामात अडथळा आनला.

या प्रकरणी कर्जतचे निवासी तहसीलदार वाघचौरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनी इडेकर हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24