मोटारसायकवरील दोघांना जबर मारहाण करत,जीवे ठार मारण्याची धमकी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : चौंडी दिघी या रस्त्याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे या दोघांना चार ते पाच जणांनी रस्त्यात अडवून काठीने जबर मारहाण केली. ही घटना दि.२३रोजी चापडगाव येथे घडली.

याबाबत कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे हे दोघेजण चौंउी दिघी या रस्त्याने मोटारसायकलवरून जात होते.

ते चापडगावात आले असता, अक्षय साहेबराव सोनवणे, संदीप साहेबराव सोनवणे, रविंद्र महादेव सोनवणे, रोहीत महादेव सोनवणे सर्वजण रा.चापडगाव, ता.कर्जत यांनी या दोघांना रस्त्यात अडवले व अक्षय सोनवणे त्यांना म्हणाला की,मला हाळगावच्या पोरांनी मारले त्या पोरांत तुम्ही दोघेही सामिल होतात.असे मला हाळगावच्या साहेब शेख व सुरेश रंधवे यांनी सांगितले आहे.

असे म्हणत हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर,हातावर,डोक्यात मारले.तसेच फिर्यादीचा मित्र अशोक ढवळे याला देखील आरोपींनी काठीने मारहाण केली.तसेच परत जर आमच्या नादाला लागलात तर जिवंत मारून टाकू असा दम देवुन निघून गेले.

याबाबत अविनाश ढवळे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली असून,पोलिसांनी वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोना. लोखंडे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24