अहमदनगर : आपल्या वडीलोपार्जित विहीरीवर जनावरे पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पती पत्नीस चौघांनी शिवीगाळ करून कुऱ्हाड व दगडाने जबर मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात पती पत्नी दोघेही जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, सुखदेव हरी गोरखे हे पत्नीसह जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या वडीलोपार्जित विहीरीवर गेले होते.यावेळी तेथे मुकिंदा हरी गोरखे, आशाबाई मुकिंदा गोरखे, राजेंद्र मुकिंदा गोरखे, संगिता दत्तु सकट, हे सर्वजण तेथे आले व त्यांनी या पती पत्नीस शिवीगाळ करून मारहाण केली.
यात फिर्यादीच्या डाव्या हातावर कुऱ्हाडीने मारल्याने ते जखमी झाले तर त्यंाच्या पत्नीस दगडाने माराण केली.यात दोघेही जखमी झाले आहेत.
याबाबत कर्जत पोलिसांत वरील चौणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत अधिक तपास पोहेकॉ.लोखंडे हे करत आहेत.