अहमदनगर : कर्जत शहरात सध्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाच दिवशी दोन सोन्याची दुकाने फोडून मोठा ऐवज लंपास केला होता.
त्यांनतर बीएसएस मायक्रो फायनान्स या कंपनीचे कार्यालय फोडून साडे तेरा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की,कर्जत शहरातील शिक्षक कॉलनीत असेलेले बीएसएस मायक्रो फासनान्स कंपनीचे कार्यालय अज्ञात चोरट्याने दि.२२ रोजी ऑफिसच्या समोरील दरवाजाचा कडी कोंयडा तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर आतील सामानाची उचकापाचक करून एलजी.कंपनीची टिव्ही,रोख रक्कम, इंटरनेट मोडेम, वोडा फोनचे डाटा कार्ड असे १३ हजार ६६४ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी दिपक विलास चव्हाण (वय २८ रा.नरसिंगपूर ता.वळवा, जि.सांगली.हल्ली रा.कर्जत) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अधिक तपास पोना भांडवलकर हे करत आहेत.