सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यावर मिरची स्प्रेने हल्ला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

केरळ – सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर हिंदू संघटनेच्या एका सदस्याने हल्ला केला. मागील वर्षी उच्च न्यायालयाने सगळ्या महिलांसाठी मंदिरात दर्शन देण्याची परवानगी दिली होती.

त्यावेळी महिला अधिकार कार्यकर्ता तृप्ती देसाई यांच्यासोबत बिंदू अम्मीनी या सुद्धा होत्या बिंदू अम्मीनी यांच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर हिंदू संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मिरची स्प्रे ने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की याची ओळख श्रीनाथ पद्मनाभन या नावाने झाली असून त्याला अटक करण्याात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. देसाई आणि आणि कार्यकर्त्यांचा विरोध करण्यासाठी अय्यप्पा भक्त मोठ्या संख्येने आयुक्तालयात बाहेर एकत्रित झाले होते.

तृप्ती देसाई सबरीमाला येथील भगवान आयप्पा मंदिरात पूजा करण्यासाठी मंगळवारी सकाळी आल्या होत्या त्यावेळी देसाई आणि अन्य कार्यकर्त्यांना कोची आंतरराष्ट्रीय हवाई विमानतळावरून कोची शहर पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले.

त्यावेळी त्यांनी सांगितले की संविधान दिवसाच्या मुहूर्तावर 26 नोव्हेंबरला त्यांना मंदिरामध्ये पूजा करायची आहे. देसाई ने सांगितले की उच्च न्यायालयाने 2018 मध्ये सगळ्या महिलांसाठी सबरीमाला मंदिर प्रवेश मंजूर केला होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24