अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर जीवघेणा हल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : शहरातील संजयनगर भागात एका तरुणावर पाच तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून पाचजणांविरूद्ध कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी शहरातील संजयनगर भागातील सोमनाथ संपत रोठे (वय २१) हा तरूण दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बकऱ्या आणण्यासाठी आरोपींच्या घराकडे गेला होता.

तो त्याच्या बकऱ्या घराकडून घेऊन परत येत असताना संजू गायकवाड, राहुल सोमनाथ गायकवाड, सोमनाथ गायकवाड, आकाश गायकवाड, किरण गायकवाड (सर्व रा. संजयनगर, ता.कोपरगाव) यांनी विनाकारण त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच संजू गायकवाड याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात चॉपर खुपसून गंभीर जखमी केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24