हिंदू विद्यार्थिनी हत्येप्रकरणी मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लाहाेर पाकिस्तानात हिंदू विद्यार्थीनीच्या हत्ये प्रकरणातील आराेपींना अटक करण्याची मागणी रविवारी मानवी हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणात निमृता कुमारीवर अत्याचार झाला हाेता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

निमृताच्या उत्तरीय तपासणीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. निमृताचा मृतदेह १६ सप्टेंबर राेजी लरकानामध्ये बेनझीर भुत्ताे वैद्यकीय विद्यापीठात विद्यार्थीनी वसतिगृहात आढळून आला हाेता. निमृता दंतवैद्यकीयची पदवीची अंतिम वर्षाची विद्यार्थीनी हाेती.

शनिवारी कराचीत शेकडाे मानवी हक्क कार्यकर्त्यानी महाविद्यालयाच्या प्रमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली हाेती. त्यासाठी निदर्शकांनी जाेरदार घाेषणाबाजीही केली. सिंध तसेच इतर प्रांतात शिक्षण संस्थांमध्ये लैंगिक शाेषण व कार्यस्थळी महिलांशी गैरवर्तनाच्या घटनांत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे,

असे महिला कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस जहरा खान यांनी सांगितले. ही माेठी समस्या आहे. लरकानामध्ये सिंध सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आराेग्यविषयक विद्यापीठाच्या प्रशासनाने निमृतावर अत्याचार व हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24