नगर – नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच महिलेच्या साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी बाळासाहेब शंकर शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात एक ४२ वर्षाची विवाहित महिला सरपंच असून तेथे काल ९. ३० च्या सुमारास सदर सरपंच महिला कार्यालयात कामकाज करत असताना तेथे आरोपी बाळासाहेब शंकर शेळके हा आला.
त्याने सदर महिला सरपंचास म्हणाला की, तू धोत्रे गल्लीतील गटारीचे काम कसे करत नाही मी ते पहातोच, तू ऑफिसचे बाहेर ये, तुझी साडी काढून…. असे म्हणत धमकावून महिला सरपंचाशी अंगाशी झटापट करून साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
आरोपी बाळासाहेब शेळके याने विनयभंग करुन सरपंच महिलेस घाण घाण शिवीगाळ करुन मोठमोठ्याने आरडाओरड करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
Entertainment News Updates