अहमदनगर : निर्मलनगरमधील सुरभी हौसींग सोसायटीतील डिझायनरचे घर फोडून चोरट्याने १ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मलनगरमध्ये सुरभी हौसींग सोसायटीत विशाल धर्मराज मुसळे (वय ३९) या डिझायनरचे घर आहे. सोमवार (दि.४) ते शुक्रवार (दि.८) या कालावधीत घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडला.
कपाटात असलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोख रक्कम असा १ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मुसळे यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.