नवरा, सासू व सासरच्या लोकांनी प्रियंका या तरुणीस सासरी नांदत असताना तुझ्या बापाने लग्नात काही दिले नाही, असे म्हणत घालून पाडून बोलून तसेच तू मोबाईल वापरायचा नाही, ड्रेस घालायचा नाही, प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
माहेरी हाकलून दिले व फोन शिवीगाळ केली. नांदायला यायचे तर तुझ्या बापाकडून पैसे घेवून ये, तुझा पगार माझ्याकडे राहील, असे म्हणून प्रियंका हिला आत्महत्येस प्रवृत्त केले.
याप्रकरणी मयत विवाहित तरुणीचे वडील साहेबराव शंकर जगताप, रा. भूषणनगर, केडगाव, सेवानिवृत्त शिक्षक यांनी काल कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली.
आरोपी नवरा सुनील सुरेश कांबळे, सासू अलका सुरेश कांबळे, सागर सुरेश कांबळे, सर्व रा. आंबेडकर पुतळ्याच्या मागे केडगाव, नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवरा, सासूसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.