वाडिया पार्कचे नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल होणार?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर – वाडिया पार्क व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल असे नामकरण करावे, असा प्रस्ताव महापालिकेने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे. 

१६ जुलैला झालेल्या महासभेत तसा ठराव घेण्यात आला होता. वाडिया पार्क क्रीडा व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल नामकरण करण्याचा ठराव २६ मे २०१२ रोजी महासभेने केला.

ही जागा क्रीडांगण विकसित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत केलेली असल्याने नगरविकास विभागाच्या पत्रानुसार नामकरण करता येणार नसल्याचे कळवण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा १६ जुलै २०१९ रोजी महासभेत ‘छत्रपती शिवाजी राजे क्रीडा व व्यापारी संकुल’ असे नामकरण करण्याचा ठराव करण्यात आला.

या ठरावासाठी मी सूचक होतो, असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले. दरम्यान, काही क्रीडा प्रेमींच्या मते या मैदानाला असलेले नाव आहे तसेच राहू द्यावे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24