नगर – फलटण जि. सातारा येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी आयसा अक्रम शेख, वय २४ हिने माहेरुन पिकअप घेण्यासाठी आई – वडिलांकडून १० लाख रुपये आणावेत,
म्हणून नेहमी पैसे आण अशी मागणी करुन शिवीगाळ करायचे, मारहाण करायचे पैसे घेवून ये म्हणत उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले व शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या प्रकरणी आयसा अक्रम शेख या तरुणीने काल कर्जत पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा अक्रम खुदबुद्दीन शेख,
सासरा खुदबुद्दीन गफूर शेख, सासू नजमा खुदबुद्दीन शेख, इकबाल गफूर शेख, सर्व रा. बारस्कर गल्ली, फलटण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेकॉ गर्जे हे पढील तपास करीत आहेत.