अहमदनगर जिल्हा पुन्हा बलात्काराने हादरला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर ;- नगर जिल्हा पुन्हा एकदा बलात्काराने हादरला आहे,अवघ्या ११ वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
पिंपळगाव माळवी परिसरात १ एप्रिल रोजी दुपारी २ . २० च्या सुमारास एक ११ वर्षाची मुलगी घरी एकटी असताना या संधीचा फायदा उठवत आरोपी प्रकाश दुर्योधन गांगडे, रा. कन्नड, जि. औरंगाबाद याने मुलीवर दोन – तीन वेळा तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
अत्याचार झालेल्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.या प्रकारात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली .या प्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी प्रकाश गांगर्डे याच्याविरुद्ध भादवि कलम ३७६, अ, ब, ५०६ पोस्को कायदा कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24