अहमदनगर : कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असून तुमच्या कोर्टाच्या निकालानंतर व ताबा मिळाल्यानंतर तुम्ही शेती करा.असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका महिलेस मारहाण करून जबर जखमी केले आहे.
याबाबत जानकाबाई कचरू पिंपळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, या शेतीचा वाद कोर्टात सुरू आहे.व निशान पाच या कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे.तेव्हा तुम्ही कोर्टाचा निकाल लागल्यानंतर व ताबा मिळाल्यानंतर शेती करा.
असे सांगितल्याचा राग आल्याने संगिता बापू पिंपळे, मीरा ज्ञानदेव पिंपळे, नंदाबाई रंगनाथ पिंपळे, रंगनाथ बापू पिंपळे, बापू रामभाऊ पिंपळे (सर्वजण रा.राळेगण म्हसोबा ता.जि.अ.नगर),यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस लाथाबुक्यांनी व काठीने पायावर, दंडावर, पाठीवर मारून जखमी केले.
तसेच शिवीगळ केली. दरम्यान भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या पतीस आरोपींनी तू जर मध्ये पडलास तर तुझा मुडदा पाडू अशी धमकी दिली. या बाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.