कुकाणे: मागील आठवड्यात सोनईतील मुळा कारखान्याच्या कामगार वसाहतीमधील अक्षय बापूसाहेब घनवट (१६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
कारखान्याच्या इंजिनियरिंग विभागातील बापूसाहेब यांचा मुलगा अक्षय दहावीत होता. त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
औषधांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुळा कारखाना, कामगार वसाहत, पानसवाडी, दुकान चाळ, सोनई गाव व पेठ भागात थंडी, ताप, सर्दी, पडसे, खोकला, मलेरियासह डेंग्यूसदृश आजाराने अनेक जण आजारी आहेत.
कामगार वसाहतीत औषध फवारणी व धुरळणी करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत याकडे गांभीर्याने पहात नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.