शिवसेनेचा बहिष्कार ग्राह्य धरू नये : खा. विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर : पारनेर तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने टाकलेला बहिष्कार हा अधिकृत नसल्याने तो ग्राह्य धरू नये, अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

खा. विखे यांच्या तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने बहिष्कार टाकला होता, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली असता, शिवसेनेचा बहिष्कार अधिकृत पत्रानुसार नसल्याने ग्राह्य धरू नये तसेच शिवसेनेने पदाधिकारी हे एक तर पंचनाम्यांत व्यस्त असतील किंवा त्यांना पंचनाम्याची गरज नसेल, त्यामुळे ते आपल्या आपल्या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले नसल्याचा टोला पत्रकार परिषदेत लगावला.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी खा. विखे पारनेर तालुक्याच्यावर आले असता, त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी बोलताना पत्रकारांनी शिवसेनेने तुमच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकल्याचे विचारले असता, खा. विखे यांनी सांगितले की, बहुतेक शिवसेनेचे पदाधिकारी आपापल्या भागात पंचनामे करण्यात व्यस्त असतील किंवा त्यांना पंचनाम्याची गरज नसल्याचे सांगत शिवसेनेने अधिकृत पत्राद्वारे बहिष्कार टाकला नसल्याने तो ग्राह्य धरू नये, अशी मिश्किल टिप्पणी केली.

विधानसभा निवडणुकीत तालुक्यात युतीचा झालेल्या पराभवात बाबत प्रश्न विचारला असता, अहमदनगरसह बीड व पुणे येथे ग्रामीण भागातील जनतेने युतीला नाकारले आहे, याबाबत आपण आत्मपरिक्षण करणार असून, सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण यावर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे स्पष्ट केले. पंचायत समितीमध्ये सभापती निवडीबाबत विचारले असता, पंचायत समितीमध्ये भाजपाचा एकही सदस्य नसल्याने आपण याबाबत बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24