कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले.

यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

पाणी उपलब्ध असूनही शेतीमालाला भाव नाही, म्हणून आत्महत्या करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24