पारनेर :- तालुक्यातील वडगाव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली.
मुलीचे आई-वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला.
त्याने पिण्यासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर पीडिता पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता भावाने घराचा दरवाजा लावून घेत बहिणीवर अमानूष लैंगिक अत्याचार केले.
सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर वडील मारतील, या भितीने पीडितेने कोणासही काही सांगितले नाही. सोमवारी सकाळी वडील दूध घालण्यासाठी गावात गेल्यावर मुलीने तिच्या आईस रविवारच्या प्रसंगाची माहिती दिली.
त्यानंतर तिची आई, वडील व बहिणीने पीडितेसह पारनेर पोलिस ठाण्यात येऊन नराधम चुलतभावाविरोधात फिर्याद दाखल केली.