पुणे : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे उस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
दरम्यान, पावसामुळे आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक उसपीकाला बसला असून राज्यात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील उस पीक वाया गेले आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पावसाने दडी मारल्याने उसाची लागवड म्हणावी अशी झाली नाही.
अद्यापही मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, सोलापूर तसेच लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाउस झालेला नाही. शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. जूनपूर्वी गाळपासाठी राज्यात साडेसहा लाख हेक्टर उस उपलब्ध होता.
मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सागंली , सातारा, कोल्हापूर या उसपट्ट्यात आलेला पूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी गाळपाचा हंगाम एक महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.