आता याला काय म्हणाव? चक्क बैलगाडीला दंड ठोठावला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बिजनौर : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, यात अनेक अजब प्रकार समोर येत आहेत. उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील साहसपूरमध्ये चक्क बैलगाडीला या नियमांतर्गत एक हजाराचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी शनिवारी बैलगाडी मालकाला दंड ठोठावला. मात्र, मोटार व्हेईकल ॲक्टमध्ये बैलगाडीला दंड करण्याची तुरतूद नसल्याने पोलिसांनी हा दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला. मालक रियाज हसनने शनिवारी आपल्या शेताजवळ बैलगाडी उभी केली होती.

त्यानंतर उपनिरीक्षक पंकज कुमार यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक या भागात गस्त घालत होते. त्यांना बैलगाडीजवळ कोणीही दिसले नाही. त्यांनी ग्रामस्थांना चौकशी करत बैलगाडी हसनची असल्याचे सांगितले.

पोलीस बैलगाडी घेऊन हसनच्या घरी गेले आणि विमा नसलेले वाहन चालवल्याचा मोटार व्हेईकल ॲक्ट कलम ८१ अंतर्गत ठपका ठेवत त्याला एक हजाराचा दंड सुनावला. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24