माध्यमांचे प्रतिनिधी सतत तैमूर अली खानच्या मागे असतात. तैमूर दिसला की फोटो काढले जातात, त्याला गराडा घातला जातो. यामुळे हा लहानगा बावरून जातो. फोटोग्राफर्सच्या या आततायीपणामुळे सैफ अली खान चांगलाच वैतागला.
तैमूरचे फोटो काढू नका, अशी विनंती त्याने फोटोग्राफर्सना केली. त्याला काही वेळ तरी एकटं सोडा, असंही तो म्हणाला. अर्थात तैमूरला आता या ग्लॅमरची खूप सवय झाली आाहे. अलीकडेच तो नेहमीप्रमाणेच फोटोग्राफर्सकडे बघून गोड हसला.
त्याने हातही हलवला. पण एवढ्या लहान वयात मिळणाऱ्या भरपूर प्रसिद्धीमुळे सैफ मात्र चांगलाच वैतागला.