अहमदनगर :- मंगल भुजबळ यांच्या फिर्यादीवरुन रेखा जरे व त्यांचा मुलगा रुनाल जरे यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून मारहाण मारहाण केल्याप्रकरणी जरे व भुजबळ यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केल्याने हा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.
रेखा जरे यांनी जिल्हा रुग्णालय क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ.सुनिल पोटे यांच्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात महिलांची बदनामी होणारा मुद्दा नमुद केल्याने अहमदनगर जिल्हा सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने रेखा जरे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
सोमवार दि.29 रोजी सायंकाळी 7 वा. आगरकर मळा येथील राहत्या घरी रेखा जरे व तीचा मुलगा रुनाल जरे यांनी घरात घुसून फिर्याद दिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करीत संसारोपयोगी वस्तूची तोडफोड करुन मारहाण केली. तर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.