अहमदनगर: श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना इंडियन सिग्नेचर ब्रँडच्यावतीने आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘आर्थिक क्षेत्रातील तज्ञ’ म्हणून गौरविण्यात आला आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते पणजी येथील शुक्रवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास अभिनेते शेट्टी यांच्यासह गोव्याचे उप-मुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर, पी. एम. मिश्रा आदी उपस्थित होते. इंडियन सिग्नेचर ब्रँडच्यावतीने देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्काराने गौरव केला जातो. दरवर्षी देशातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
या वर्षी बँकिंग आर्थिक व वाणिज्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा आर्थिक वर्षातील ‘फायनान्स एक्सपर्ट’ म्हणून रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत भालेराव यांना प्रदान करण्यात आला.
पणजी येथील हॉलिडे रिसॉर्ट येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचा स्वीकार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल भालेराव यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.