राहुरीत पोलीस व दरोडेखोरांत धुमश्चक्री, चार अट्टल दरोडेखोर जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळवले, तर दोघेजण पसार झाले. 

या वेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
सागर गोरख मांजरे (२२), अविनाश अजित नागपुरे (२०), काशिनाथ मारुती पवार (३७), गणेश मारुती गायकवाड (२४) अशी पकडलेल्या आरोपींची नावेत आहेत.
तर पसार झालेल्या दोन आरोपींची नावे मात्र अजून समजलेली नाहीत. आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, कात्री, गज, एक पोखर, लोखंडी सुरा, पेटी, चार मोबाइल, दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीच्या संदर्भामध्ये राहुरी पोलिसांना माहिती मिळाली. रात्री सव्वातीन वाजता या दरोडेखोरांचा पाठलाग राहुरी पोलिसांनी सुरू केला.
त्यानंतर पोलीस व दरोडेखोर यांच्यात धुमश्चक्री होऊन राहुरी पोलिसांनी चौघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यातील दोन आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24