राहुरी – येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर गावरान कांद्याला ४७०० ते ५८००, तर गोल्टी कांद्याला ४००० ते ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला.
सोमवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर भाव कमी झाल्याचा अपवाद वगळता भावात सुधारणा झाली. रविवारी ९८५९ गोण्यांची आवक झाली.
दोन नंबर कांद्याला ३३०० ते ४६९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १००० ते ३२९५ रुपये भाव मिळाला. ७ गोण्यांना ६५००, ३३ गोण्यांना ६४०० व ३२ गोण्यांना ६२०० रुपये, तर २० गोण्यांना ६०५१ ते ६१०० रुपये भाव मिळाला.