कर्जत : आगामी पाच वर्षांत मतदारसंघाचा असा विकास करून दाखविल की, संपूर्ण महाराष्ट्र येथील विकास पाहायला आला पाहिजे, आपण अगोदर करतो व नंतर सांगतो आणि काम करण्यावर जास्त भर देतो. मतदारसंघात जे होत नव्हते ते काम तुमच्या विश्वासामुळे करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
वालवड (ता. कर्जत) येथे संत सद्गुरू श्री गोदड महाराज सहकारीू सूतगिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. गुगळेचे संचालक तथा उद्योजक दिलीप गुगळे, ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एच.यू. गुगळे उद्योग समूहाचे प्रमुख व या सूतगिरणीचे प्रमुख दिलीप गुगळे होते.
प्रास्ताविक मुकुंद गुगळे यांनी केले. या वेळी वस्रद्योगचे सहसचिव शरद जरे, जामखेडचे सखाराम भोरे, नंदलाल काळदाते, सभापती साधना कदम, अल्लाउदद्दीन काझी आदींची भाषणे झाली. या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत रोहित पवार व राष्ट्रवादीत राहिलेल्या सात नेत्यांवर टीका केली.
या वेळी ना. शिंदे म्हणाले, या सूतगिरणीद्वारे दीड हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. आहे. या सूतगिरणीत मतदारसंघातीलच लोकांना काम देण्याच्या सूचना मंचावरूनच ना. शिंदे यांनी गुगळे यांना दिल्या. या सूतगिरणीचे काम एका वर्षात पूर्ण होईल, असे सांगतानाच परिसरातील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळणार आहे.
आपल्या मंत्रीपदाच्या काळात ३६ वर्षांचे माळढोक आरक्षण हटविले तसेच तुकाई चारीचा प्रश्न मार्गी लावला आहे. शहराच्या पाणीटंचाईवर मात केली. जलसंधारणमंत्री असताना १९७८ चा कायदा प्रथमच अंमलात आणत प्रथम टेलला पाणी देण्याचा निर्णय घेतला. ५० वर्षांत जे झाले नाही, ते आपण पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मतदारसंघात एमआयडीसीसह रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणखी नवनवीन प्रकल्पासाठी काम करणार असल्याचे ना. शिंदे यांनी जाहीर केले. या वेळी वस्रद्योगचे उपायुक्त सुरेंद्र तांबे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जामखेडचे सभापती भगवान मुरूमकर, बाजार समितीचे अध्यक्ष श्रीधर पवार, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सोमनाथ पाचरणे,
जामखेड तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, स्वप्नील देसाई, अंगद रुपनर, शिवसेनेचे अमृत लिंगडे, शांतीलाल कोपनर, काका धांडे, मनोज कुलकर्णी, डॉ. सुनील गावडे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, अमित चिंतामणी, लाला शेळके, विक्रम राजेभोसले, लहू शिंदे, सुमित दळवी, गणेश पालवे, माणिकराव जायभाय, डॉ. सुनीता गावडे, राजू गायकवाड,
विलास मोरे, सुनीलकाका यादव, छबन जगताप, संभाजी देसाई, धनंजय मोरे, बिभीषण गायकवाड, सौ. सुनीता गुगळे, सौ. मनीषा गुगळे, सौ. अंजली मुनोत, सौ. मंजुषा गांधी, सौ. राखी गांधी, सौ. प्रिया भंडारी, विवेक भंडारी, मुकुल गुगळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिलीप गुगळे यांनी आभार मानले.