६ वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या मुलाकडून बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- तालुक्यातील एका गावातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ ते १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला.

त्यानंतर शेजारीच राहणारा हा आरोपी मुलगा पळून गेला. याप्रकरणी आज पिडीत मुलीचे नातेवाईक लहान मुलीला घेवून पोलिसांकडून आले होते. राहुरी पोलिसांनीही घटनेची गांभिर्य लक्षात घेवून आरोपी शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना केले.

दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी व तपास सुरु होता. दरम्यान शेजारच्या मुलाकडून अशाप्रकारे ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24