शेतीच्या वादातून बेदम मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी काढले? असे विचारले असता
त्याचा राग येऊन सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (सर्व रा. जेऊर) यांनी मगर यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तर सुरेश तवले याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24